मुंबई – देशात सध्या कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांची वाढत जाणारी संख्या सर्वांच्याच चिंतेचा विषय बनत चालली आहे. यातच आता कोरोना काळात मोदी सरकार करत असलेल्या कारभारावरून विरोधक टीकास्त्र सोडत असल्याचे दिसून येत आहे.
नदीमध्ये मृतदेह प्रवाहीत करणे… ऑक्सिजन अभावी लोकं मरत आहेत… औषधांचा तुटवडा आहे… देशात लस उपलब्ध नसताना लस देण्याचा कार्यक्रम जाहीर करणे हे इंडियन मॉडेल कोणच स्वीकारणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदींच्या इंडियन मॉडेलचा समाचार घेतला आहे.
इंडियन मॉडेल झालेच पाहिजे परंतु हेच इंडियन मॉडेल असेल तर लोकांना यावर बोट ठेवण्याची संधी भाजप निर्माण करुन देतेय असेही नवाब मलिक म्हणाले.चांगली कामे करत राहिले पाहिजे. एखादं यश असेल किंवा काम झालं असेल तर निश्चितरुपाने लोकं प्रशंसा करतात पण अपयशी ठरुनही आम्ही चांगलं काम करतोय असं भाजप बोलत राहिला तर लोकं स्वीकारणार नाहीत असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- वाढदिवशी तेजस्विनीनं केली नव्या वाटचालीची सुरुवात ; केली मोठी घोषणा
- ‘आज बाळासाहेब असते, तर कोकणची दुर्दशा पाहून…’; भाजपचं पुन्हा एकदा टीकास्त्र
- वरुडी येथे भरधाव जीप घुसली थेट पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये; ३ पोलीस जखमी
- मलायका सोबतच्या अफेयरवर अर्जून कपुरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला…
- तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका; मुख्यमंत्र्यांनी दिला डॉक्टरांना ‘हा’ खास सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

