Share

ही कसली मग्रुरी ? आई-वडिलांचे औषध आणणाऱ्या युवकाला जिल्हाधिकाऱ्याने लगावली कानशिलात अन् फोनही फोडला !

Published On: 

रायपूर : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यामुळेच, पुन्हा एकदा अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मागील वर्षी आर्थिक पेचात सापडलेल्या सामान्यांना पुन्हा एकदा या संकटाचा सामना करावा लागत असून ते यंत्रणेला साथ देखील देत आहेत.

मात्र, काही ठिकाणी प्रशासन दादागिरी करत असल्याच्या घटना आता समोर येत आहे. नागपूरमध्ये भाजीविक्रेत्याचा माल पोलीस रस्त्यावर फेकून नासधूस करतानाच व्हिडीओ व्हायरल झाला असतानाच आता एका जिलाधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्ह्यामध्ये औषधं आणण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी मोबाईल फोडून त्याला कानशिलात लावली, त्याचा फोन रस्त्यावर आपटून फोडला एवढंच नाही तर, नंतर त्याला पोलिसांकडून मारहाणही केली.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या जिलाधिकाऱ्यांना कसली मग्रुरी चढलीये असा संतप्त सवाल सामान्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी त्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. यानंतर, सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांचं तात्काळ निलंबन करावं असा आदेश मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिलाय. तसेच या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

नियम पळून, अत्यावश्यक कारण असल्यास नागरिकांना सूट देण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक गैरफायदा घेत असतात. तर, जे नागरिक खरंच अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडतायत त्यांनाच कारवाईला सामोरं जावं लागत आहे. त्यातच, अशाप्रकारे कायदा हातात घेऊन नागरिकांवर मुजोरी करणे हे निंदनीय आहे.

याबाबत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणता, ‘सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी एका युवकाशी गैरव्यवहार केल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. ही घटना अत्यंत दु:खद आणि निंदनीय आहे. छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचे वर्तन कधीही सहन केलं जाणार नाही. जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांना तात्काळ निलंबित केलं जात आहे.’

पुढे त्यांनी या घटनेबाबत दिलगिरी देखील व्यक्त केलीय. ‘प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून अशा प्रकारचे वर्तन स्वीकाहार्य नाही. या घटनेमुळे मला वेदना झाल्या आहेत. मारहाण झालेल्या त्या तरुण आणि कुटुंबाप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!