Share

उस्मानाबादेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल ३ लाखाचा दंड वसूल!

Published On: 

उस्मानाबाद: राज्यात तसेच जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी कडक नियमांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात देखील संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु आहे. विनामास्क तसेच विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून चांगलाच दंड आकारण्यात येत आहे. तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लोकांकडून पोलिसांनी एकाच दिवसात तब्बल ३ लाखांचा दंड आकारला असल्याची माहिती समोर आली आहे.

लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन केल्यास दंड वसुलीचे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या २१ जणांवर कारवाई करत ७ हजार ४०० रुपये वसूल करण्यात आले. मास्क न लावता फिरणाऱ्या ११३ नागरिकांकडून ५६ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले, तसेच ११०५ दुकान चालकांविरोधात कारवाया करून २ लाख ३३ हजार ८०० रुपये वसूल करण्यात आले. असा एकूण ३ लाख ११ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाडू नये या साठी राज्य सरकारने तसेच स्थानिक प्रशासनाने कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला होता. तसेच नागरिकांनी बाहेर फिरून स्वतःचा जीव धोक्यात घालून तसेच आपल्या कुटुंबाचा जीव देखील धोक्यात घालू नये यासाठी घरात बसण्यासाठी सांगण्यात आले होते, मात्र गांभीर्य नसलेले नागरिक सर्रास नियम मोडून बाहेर फिरत आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा जरी कमी येत असला तरी अजून कोरोनाचे संकट अद्याप गेले नाहीये, त्यामुळे नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!