लातूर: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत असल्याचे दिसत आहे. शनिवारी एकूण २९९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तसेच २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्या कमी होत असली तरी मृत्यू दर काही कमी होत नाहीये. मृत्यू दर देखील कमी होण्यास सुरुवात झाली तर कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात आला असं म्हणता येईल तसेच लातूरकरांना देखील जरासा दिलासा मिळेल.
शनिवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये १४८ तर रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये १५९ असे मिळून २९९ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. आज आरटीपीसीआर एकूण टेस्ट १०३१ तर रॅपिड अँटिजेन टेस्ट २१५३ झाल्या. एवढ्या टेस्टमधून २९९ रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ८७ हजार २१८ पॉझिटिव्ह रूग्ण सापडले असून, यातील उपचाराने ८० हजार ८९९ रूग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत.
होम आयसोलेशनमध्ये २६५८ तर प्रत्यक्ष रूग्णालयात १७१७ रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात शनिवारी २६ जणांचा कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झाला. आजावर जिल्ह्यातील १९४४ नागरिक कोरोना मृत्यू पावले आहेत. आज ४२८ बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. शनिवारी कोरोना बाधित रूग्णांची संख्या खाली असली तरी हा आकडा असाच खाली खाली येणे गरजेचे आहे. परंतु, मृत्यूचा आकडा आणखी आत येणे आवश्यक असून, तो शून्यावर येऊन ठेपला पहिजे, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपची सरकारे असलेल्या राज्यातच मोदी मॉडेलचा फज्जा उडाला’
- विवाहितेस घराबाहेर हाकलणाऱ्या पतीची हर्सुल कारागृहात रवानगी
- ही कसली मग्रुरी ? आई-वडिलांचे औषध आणणाऱ्या युवकाला जिल्हाधिकाऱ्याने लगावली कानशिलात अन् फोनही फोडला !
- उस्मानाबादेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल ३ लाखाचा दंड वसूल!
- मोदींचे ‘असे’ इंडियन मॉडेल कोणच स्वीकारणार नाही – नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

