पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. २७ मार्च म्हणजेच शनिवारी पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याच्या निवडणुका काही तासांवर असतानाही राजकीय टीका-टिप्पणी सुरूच असल्याचं दिसून येत आहे. तर, भाजपा आणि टीएमसी यांच्यात मुख्य लढत आहे.
भाजपाने सुवेंदु अधिकारी यांना मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उभं केल आहे. शुक्रवारी झालेल्या प्रचारसभेमध्ये त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. “इथे उद्योगविश्वाचा विकास थांबला आहे, फक्त त्यांची दाढी वाढते आहे. कधी ते स्वत:ला स्वामी विवेकानंद म्हणवून घेतात, तर कधी स्टेडियमला स्वत:चं नाव देतात. त्यांच्या डोक्यात काहीतरी बिघाड झाला आहे. त्यांचा स्क्रू ढिला झालाय असं वाटतंय”, अशी बोचरी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
२७ मार्च म्हणजेच शनिवारी पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. स्वतः ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात त्यांचेच एकेकाळचे विश्वासू सहकारी आणि सध्या भाजपामध्ये सामील झालेले सुवेंदु अधिकारी यांना भाजपाने नंदीग्राममधून उभं केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ण्यात कोरोनाचा कहर : नवीन नियमावली जाहीर, वाचा काय राहणार सुरु काय होणार बंद !
- चारशे वर्षांच्या इतिहासावर कोरोनामुळे गदा! २० मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार नाथ सोहळा
- ऋषभ पंत ४३६ दिवसांनी वनडे खेळला अन् इंग्रजांना पळता भुई थोडी…
- मांजरा धरणाचा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी गेले वाया
- खुप गरजेचे काम असेल तरच बाहेर पडावे, पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या सुचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

