कोलकता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत चांगलाच रंग चढला आहे. भाजपा आणि टीएमसी यांच्यात मुख्य लढत आहे. भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत.
कॉंग्रेसची या निवडणुकीत डाव्यांच्या सोबत आघाडी आहे तर एमआयएम देखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे.यामुळे ममता बॅनर्जी यांना भाजपाबरोबरच एमआयएम ,काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीविरोधात लढावे लागणार आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मदतान पार पडले असून आता दुसऱ्या टप्प्यातील लढतीला सुरुवात झाली आहे. सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला निवडणूक मतदारसंघ नंदीग्राममध्ये व्हिलचेअरवरुन रोड शो केला.
या ‘रोड शो’ला हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती. ममता सोमवारी खुदीराम रोड ते नंदीग्रामच्या ब्लॉक-२ पर्यंत रोड शो केला. यावेळी भर उन्हात त्या व्हिलचेअरवरुन प्रचार करताना दिसल्या. कथितरीत्या झालेल्या हल्ल्यात ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना व्हिलचेअरचे सहाय्य घ्यावे लागत आहे. अशा परिस्थितीतही त्यांनी वरुन सूर्य आग ओकत असताना प्रचार केला.
दुसऱ्या टप्प्यातील मतदान १ एप्रिलपासून सुरु होतंय. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. सुवेंदु अधिकारी यांनी आव्हान दिलंय की, ते ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये ५० हजार मतांच्या फरकाने मात देतील. मंगळवारी गृहमंत्री अमित शहा सुवेंद्र अधिकारी यांच्यासाठी रोड शो करतील.
नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती हेही नंदीग्राममध्ये प्रचार करताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीतच पश्चिम बंगालमधील सध्याची राजकीय स्थिती पाहता कोणाला बहुमत मिळणार याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागलेली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पवारांनी लवकरात लवकर पुन्हा महाराष्ट्राचे मार्गदर्शन करण्यासाठी रुजू व्हावे – चंद्रकांत पाटील
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- ‘बांगलादेश लढ्यात मोदींना नेमकी कधी अटक झाली होती? ती माहिती दिल्यास…’
- मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते समाधान अवताडे कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

