Share

‘भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी रेकॉर्ड ब्रेक मते मिळविणार’, संजय राऊतांचा विश्वास

Published On: 

मुंबई: पश्चिम बंगालमधील भवानीपूर, जग्नीनपूरसह सरशेरगंज या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळीच सुरुवात झाली. या निवडणुकीकडे पूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण ममता बॅनर्जींनी सत्ता मिळवली मात्र, त्यांना विजयी होता आले नाही. ममता बॅनर्जी निवडून आल्यास त्यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत टीएमसी पक्षाने मोठे परिश्रम घेतले आहेत. तर या निवडणुकीवरूनच संजय राऊत यांनी एक मोठे भाकीत केले आहे.

ममता बॅनर्जी भवानीपूरमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतांनी जिंकणार, भवानीपूर हा त्यांचा परंपरागत गड आहे. त्या विक्रमी मतांनी जिंकतील याची संपूर्ण देशाला खात्री आहे. अशी आशाही संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान ममता बॅनर्जी या २ हजार ३७७ मतांनी आघाडीवर आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रियांका टिबरेवाल यांना ८८१ मते मिळाले आहेत. पहिल्या फेरीत ममता बॅनर्जी ३ हजार ६८० मतांनी आघाडीवर होत्या. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रियंका टिबरेवाल यांना पहिल्या फेरीत ८८१ मते मिळाली आहेत. भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने ममता बॅनर्जींविरोधात प्रियांका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत ममता बॅनर्जीच निवडून येणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. या जागेसाठी ५३ टक्के मतदान झाले आहे. यात बहुतांष बोगस मतदान झाल्याचा अरोप भाजपाने केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!