Share

ममता बॅनर्जींनी केले गांधीजींच्या मूर्तीसमोर चित्रे काढत धरणे आंदोलन

Published On: 

कोलकत्ता : देशात सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू ,केरळ आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. या निवडणुकीत बंगाल ची निवडणूक प्रतिष्ठेची लढत बनली आहे. येथे मोदी विरूद्ध ममता असाच प्रचार निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून सुरू आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. यातच निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना पुढील २४ तासांसाठी निवडणूक प्रचारावर बंदी घातली आहे. सोमवार रात्री ८ वाजल्यापासून ही बंदी लागू करण्यात आलेली आहे.

ममता बॅनर्जी यांनी एका प्रचार रॅलीदरम्यान हिंदू आणि मुस्लिम समाजावर वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. आदर्श आचारसंहितेचे पालन न केल्यामुळे याची दखल घेत निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना पुढील २४ तासांकरिता निवडणूक प्रचारासाठी बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाकडून 24 तासांसाठी प्रचारावर बंदी घालण्यात आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता धरणे देण्यासाठी बसल्या आहेत. यावेळी त्या बसल्या बसल्या काही चित्रे काढतानाही दिसून आल्या. कोलकातामध्ये गांधी मुर्तीच्या जवळ ममता बॅनर्जी धरणे देत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!