नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच प्रमुख पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मतं आहे. तज्ञांच्या याच मताला लक्षात घेत केंद्र सरकारने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे.
करोनाविरुद्ध लढण्यासाठी रशियानंतर आता अमेरिका, जपान आणि ब्रिटनमधूनही लस आयात केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून परदेशात विकसीत करण्यात आलेल्या लसींना आयात केलं जाणार आहे. ‘नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड १९’ (NAGVAC) या तज्ज्ञांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
देशात सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या वापर सुरु आहे.पण, लशीच्या पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. लशींची चणचण जाणवत असताना देशाला स्पुटनिक लस मिळाल्यास मोठी मदत होणार आहे. या निर्णयामुळे भारतातील लसिकरणाला अधिक गती मिळेल अशी शक्यता आहे.
USFDA (U.S. Food and Drug Administration), EMA (European Medicines Agency), UK MHRA (Medicines and Healthcare products Regulatory Agency), PMDA JAPAN (Pharmaceuticals and Medical Devices Agency) याशिवाय WHO (World Health Organization) च्या यादीत सहभागी झालेल्या आणि इतर देशांत आपात्कालीन मंजुरी मिळालेल्या लसींना भारतातही आपात्कालीन मंजुरी देण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या समितीचा हा प्रस्ताव भारत सरकारकडूनही मान्य करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- दलित भिकारी नाहीत तर शिकारी आहेत : रामदास आठवले
- कुंभमेळ्यातील गर्दीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले..
- मोठी बातमी : सचिन वाझे पाठोपाठ सहकारी रियाझुद्दीन काझीही निलंबित
- बोगस डॉक्टरने सुरु केले होते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुण्यातील धक्कादायक प्रकार
- उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संतप्त सवाल


