Share

कुंभमेळ्यातील गर्दीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले..

Published On: 

मुंबई : उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कुंभमेळा सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविकांची गदी झालेय. दोन दिवसांपूर्वी ४०१ जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर काल झालेल्या शाहीस्नानानंतर १०२ साधू आणि भाविकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही संख्या आणखीन वाढणार हे निश्चित आहे. दरम्यान, कुंभमेळ्यातील गर्दीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, रुग्णसंख्या वाढत असली तरी संपूर्ण देशाचा विचार करायला हवा. हरिद्वारमध्ये लाखो लोक एकत्र आले. त्यावर नियंत्रण ठेवायला हवे होते. राज्यात गुढीपाडवा साजरा करण्यावर मुख्यमत्र्यांनी नियंत्रण आणले. लोकांना आवडत नसले तरी पण सरकारने हे केले. महाराष्ट्रात इतर राज्यांमधून लोक येत असून तिथे नियंत्रण नाही ही विचार करण्याची गोष्ट आहे.

मला जे काही चित्र दिसत आहे त्यानुसार महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभर असा निर्णय लावला गेला तरी आश्चर्य वाटणार नाही. काल हरिद्वारला सुद्धा लाखो लोक एकत्र आले, पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांच्या सभा होत आहेत. त्या मानाने महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आहे. कायदा आणि नियमांचं पालन होत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

तर दुसरीकडे पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी तिथल्या गर्दीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ‘वो करे तो लीला, हम करे तो जुर्म! वाह मोदीजी वाह!’, असे ट्विट खा.जलील यांनी केले आहे. शिवाय त्यासोबतच हरिद्वार येथील कुंभमेळ्यातील गर्दीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!