Share

ममता यांच्या भेटीनंतर पवारांनी कॉंग्रेसबद्दल केलं ‘हे’ मोठं विधान

Published On: 

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशाच्या राजकारणाला वेगळे वळण या बैठकीमुळे येणार असे मत देखील तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

शरद पवार म्हणाले, सध्याच्या काळात एकत्रित नेतृत्व करण्याची गरज आहे. २०२१४ च्या निवडणुकीकरता सत्ताधारी पक्षाविरोधात एक मजबूत नेतृत्व उभारण्याची गरज आहे. याच हेतूस्तव ममता बॅनर्जी यांनी हा दौरा केला. या बैठकीत त्यांनी अत्यंत सकारात्मक चर्चा केली, असं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात ममता बॅनर्जी यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. मात्र काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी संवाद साधला नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

कॉंग्रेसला यातून वगळण्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित केल्यावर शरद पवार म्हणाले, काँग्रेसला वगळण्याची चर्चाच नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची बात आहे. त्यासाठी जो मेहनत करेल आणि सर्वांसोबत यायला तयार आहे, त्या सर्वांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत, असं शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!