Share

…मग 5 हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन हा काय लोकशाहीचा विजय का?- सदाभाऊ खोत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संसदचे हिवाळी अधिवेशन गेल्या 2 दिवसांपासून सुरु झाले आहे. या अधिवेशनाची तुफान चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी प्रचंड गादारोळ झाला. पहिल्याच दिवशी खासदारांचं निलंबित केले. त्यानंतर खासदारांनी संसद भवनाच्या परिसरामध्ये निदर्शने केली. खासदारांच्या निलंबनावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकरावर टीका केली होती.

12 खासदारांना निलंबित करणं हा लोकशाहीचा खून असल्याची टीका संजय राऊतांनी केली होती. संजय राऊतांच्या याच टीकेला सडेतोड उत्तर देताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

बारा खासदार निलंबित, हा लोकशाहीचा खून असं संजय राऊत म्हणतता तर मग अनिल परब साहेब यांच्याकडून एसटी महामंडळातील 5 हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन हा काय लोकशाहीचा विजय का? अहो हिच का हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना?, असा सवाल करत सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं आहे.

दरम्यान, राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी आंदोलन केलं. या दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न करता त्यांच्यावर कारवाई करत तब्बल 5 हजार एसटी कर्मचाऱ्यांना  परिवहन मंत्री अनिल परब यांनी निलंबनाची नोटीस बजावत निलंबित केलं होतं. या पार्श्वभूमीवरुन सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेला खडेबोल सुनावले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!