Share

विजयासाठी ममता बॅनर्जींनी मागितली भाजपाच्या नेत्याला मदत

Published On: 

कोलकाता : तृणमूल कॉंग्रेस -भाजपामध्ये मुख्य लढत असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी मतदान होत आहे. मात्र, निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रलय पाल यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्याला फोन करून नंदीग्राममधील विजयासाठी मदत मागितली असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सकाळी मला फोन करून नंदीग्राममधील विजयासाठी मदत मागितली असल्याचा दावा प्रलय पाल यांनी केला आहे. या संभाषणाची एक ऑडिओ क्लिपही भाजपाने व्हायरल केली आहे. तर ऑडिओ क्लिपमधील आवाज व्हेरिफाईड नसल्याचं टीएमसीने म्हटलं आहे.

‘मी त्यांच्यासाठी काम करावं आणि टीएमसीमध्ये प्रवेश करावा असं ममता बॅनर्जींचं म्हणणं होतं. परंतु मी गेल्या अनेक वर्षांपासून शुभेंदू अधिकारी यांच्या कुटुंबासोबत आहे. आता मी भाजपासाठी काम करत आहे.’ असं पाल यांनी म्हटलं आहे.

पाल यांच्या या दाव्याने बंगालच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजपाचे शुभेंद्रू अधिकारी याच आव्हान असणार आहे.

‘डाव्यांच्या सत्तेच्या काळात अत्याचार वाढले होते. तेव्हा नंदीग्रामच्या जनतेच्यापाठी फक्त अधिकारी कुटुंबच उभं राहिलं होतं. मी कधीच अधिकारी कुटुंबाच्या विरोधात गेलो नाही आणि यापुढेही कधी अशी हिंमत करणार नाही’ असं देखील पाल यांनी म्हटलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!