मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारला विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून अडचणीत आणले आहे.सध्या राज्यात फोन टॅपिंग प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. पोलीस दलातील बदल्यांबाबतचा फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे बिंग फुटणार असल्यानेच राज्यातील नेते अस्वस्थ आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झाला आहे. त्यातून अनेकांचे बिंग फुटणार आहे. त्यामुळेच अनेकजण अस्वस्थ झाले आहेत, असं फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र पोलीस दलाची बदनामी करण्याचं काम कुणी केलं? वाझे सारख्या निलंबित अधिकाऱ्याला सेवेत घेऊन त्याच्याकडे महत्त्वाच्या केसेस देण्यात आल्या. वाझे सारख्यांना सेवेत घेऊन सिंडिकेट राज चालवण्यात आलं. त्यामुळे पोलीस बदनाम झाले की पोलिसांचं नाव झालं ते सांगा? असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान राज्यात भाजप सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी शुक्ला यांनी फोन टॅपिंगचा राजकीय हेतूने गैरवापर केल्याचा ठपका कुंटे यांच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. गुप्तचर विभागाच्या तात्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विषयी दिलेल्या माहितीवरून राज्यात आरोपप्रत्यारोप होऊ लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ज्यांचे चित्रपट कधी चालले नाहीत त्यांना कोव्हिड सेंटरचे कंत्राट दिले’
- पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- फुकटात मंत्रिपद मिळालंय, म्हणून आव्हाडांची वळवळ सुरु आहे – राणे
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं


