मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ता तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. ड्रग्स प्रकरणावरून सुरू झालेले हे प्रकरण आता वयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलं आहे. नवाब मालिक यांनी आता थेट समीर वानखेडे यांच्या धर्मावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून प्रकरण चांगलेच तानले आहे. या सर्व प्रकरणात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नवाब मलिक यांचे समर्थन केले आहे.
अधिकारांचा गैरवापर होत असेल तर तसे करणाऱ्यांना उघडे पाडणे गरजेचे आहे. गैरप्रकार रोखणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करीत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. भाजप ईडी, सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणा हाताशी बाळगून विरोधकांवर त्यांचा हवा तसा वापर करत असल्याची टीका भाजपवर करण्यात येत आहे. त्यामुळे अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी योग्य ती कारवाई केंद्राने करायला हवी, असंही पवार म्हणाले आहेत.
अधिकारांचा गैरवापर करणाऱयांना उघडे पाडण्याचे काम नवाब मलिक करीत आहेत. ही त्यांची जबाबदारी आहे. नवाब मलिक यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर केंद्र सरकारने तातडीने कारवाई करायला पाहिजे, असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले. सत्ता मिळत नसल्याने नैराश्यातून वाटेल ते आरोप भाजपकडून करण्यात येत असून त्याला फार महत्त्क देण्याची गरज नसल्याचे शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने सांगितले पराभवाचे कारण
- माझे वडील नेहमीच गांधीजींचे प्रशंसक राहिले आहेत-अनिता बोस
- लसीकरण जागृतीसाठी सलमानची मदत घेण्याबाबत राजेश टोपेंचा खुलासा
- आमच्या पगारात खा. राऊतांनी घर चालवून दाखवावे, एसटी कर्मचाऱ्यांचे आव्हान
- टीम इंडिया 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणार का पाकिस्तानला?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

