नवी दिल्ली : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जिंकला. त्याचवेळी केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद भूषवलेल्या टीम साऊदीला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाबाबत टीम साऊदीने म्हटले आहे की, आम्हाला भारताविरुद्ध सुरुवातीपासूनच दबाव निर्माण करायचा होता, पण ते होऊ शकले नाही आणि टीम इंडिया जिंकली.
नियमित कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत किवीजचे कर्णधारपद भूषवणारा टीम साऊदी पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात किवींच्या पराभवावर म्हणाला, ‘तुम्हाला नेहमीच सामना जिंकणाऱ्या संघाचा भाग व्हायचे आहे. आम्ही सर्वोत्तम क्रिकेट खेळलो आणि सामना शेवट पर्यंत नेला. मार्क चॅपमनने काही काळापासून फारसे क्रिकेट खेळले नाही, परंतु या सामन्यात तो ज्या प्रकारे खेळला, ते पाहून संघाला आनंद झाला. हा सामना खूप चांगल्या फरकाचा होता.’
टीम साऊदी म्हणाला, ‘ही चांगली धावसंख्या होती, आम्हाला चेंडूने चांगली सुरुवात करायची होती पण तसे झाले नाही. मात्र, आम्ही मध्यभागी चांगले पुनरागमन केले आणि अर्थातच मिचेल सँटनरने चेंडूवर उत्कृष्ट खेळ केला. त्याने हा सामान शेवटच्या षटकापर्यंत नेला. ते आमच्यासाठीही सकारात्मक होते. वेगवेगळ्या मैदानांवर आणि अशा गोष्टींमुळे खेळणे नेहमीच कठीण असते, परंतु आम्ही स्वतःकडून आणखी अपेक्षा करतो.’
कर्णधार साऊदी म्हणाला, ‘फिल्डिंग हे एक क्षेत्र आहे ज्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही गेल्या काही महिन्यांत खूप चांगला खेळ दर्शवला आहे. तसेच कर्णधाराने सर्व खेळाडूंचे कौतुकही केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल- शरद पवार
- गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करा- राहुल गांधी
- क्रांती रेडकरने शेअर केले समीर वानखेडेंचे जन्म प्रमाणपत्र
- ‘त्याला माझ्या कमतरता माहीत आहेत’, रोहितने केले न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूचे कौतुक
- वानखेडेप्रकरणी नवाब मलिक यांचा उच्च न्यायालयात अर्ज दाखल


