Share

लसीकरण जागृतीसाठी सलमानची मदत घेण्याबाबत राजेश टोपेंचा खुलासा 

Published On: 

मुंबई : कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात लसीकरणावर अधिक भर देण्यात येत आहे. यातच महाराष्ट्रामध्ये अधिक करून लसीकरण करण्याची प्रक्रिया जोरदार होत आहे. मात्र अजूनही काही भागांमध्ये कोरोना लसीकरण घेण्याबा बत लोकांमध्ये शंका आहे. यासाठी आता राज्य सरकार बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मदत घेणार असल्याचे सांगण्यात आले. यावरून यावरून भाजप आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरवात केली. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

टोपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की,‘मिशन कवच कुंडल’ या मोहीमेअंतर्गत लसीकरणासाठी जनजागृती करण्याचे काम हे घराघरात जाऊन होत आहे. तसेच वेगवेगळ्या समाजांमध्ये लसीकरणाचे प्रबोधन करण्यासाठी धर्मगुरु, मौलवी, स्थानिक पातळीवरील सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी करण्यात येत आहे. यामध्ये कोणी सेलेब्रिटी सहभाग घेत असेल तर ते कोण्या एका समाजाचे सेलिब्रिटी नसतात अशी भूमिका राजेश टोपे यांनी मांडली.

‘देशात कोरोना संक्रमाची सुरूवात झाल्यापासून यात कोणतेही राजकारण नको, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे लसीकरणात कोणतेही धार्मिक राजकारण न करता लसीकरण लवकर कसे पूर्ण होईल, हा मुख्य आहे. विविध धर्मांमध्ये जर लसीकरणाबाबत कुठे काही शंका असतील, तर त्यांना देखील आपण सहभागी करत आहोत. असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.

याआधी कोव्हिशिल्डच्या दोन लसमात्रांमधील अंतर कमी करावे, लहान मुला-मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू करावी आणि ‘बुस्टर डोस’ देण्याबाबत विचार केला जावा, अशा तीन महत्त्वाच्या मागण्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांची भेट घेऊन केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!