नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला दिले आहे. 29 वर्षांनंतर पाकिस्तान आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. पाकिस्तानला यजमानपद मिळाल्याने टीम इंडिया शेजारील देशाचा दौरा करणार का, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
याच प्रश्नाच उत्तर आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी दिले आहे. टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांशी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘या निर्णयात गृह मंत्रालयाचा सहभाग असेल आणि बरेच मूल्यांकन केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल.’
‘दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे भारताने अनेक दिवसांपासून पाकिस्तानला भेट दिली नाही. आयसीसी स्पर्धांमध्ये हे दोन्ही देश आमनेसामने आहेत. वेळ आल्यावर काय करायचे ते बघू, असे अनुराग ठाकूर म्हणाले. या निर्णयात गृह मंत्रालयाचा सहभाग असेल.’
ते पुढे म्हणाले की, अलीकडेच अनेक देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात जाण्यापासून माघार घेतली आहे. त्यावेळी पुन्हा सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेऊ. असे ते म्हणाले आहेत.
ICC ने जाहीर केले 2031 चे वेळापत्रक
आयसीसीने मंगळवारी 2031 पर्यंतच्या स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले. पाकिस्तानला 29 वर्षांनंतर आयसीसीच्या स्पर्धेची जबाबदारी मिळाली आहे. 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही संघ पाकिस्तान दौरा टाळत आहेत.
न्यूझीलंड या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता, मात्र मालिका सुरू होण्यापूर्वी त्यांनी सुरक्षेचे कारण सांगून दौरा रद्द केला. यापूर्वी १९९६ च्या विश्वचषकाचे यजमानपद पाकिस्तानने संयुक्तपणे केले होते. पाकिस्तानशिवाय या स्पर्धेचे सामने श्रीलंका आणि भारतामध्ये खेळले गेले.
ICC वेळापत्रक
2024 ते 2031 पर्यंतच्या ICC मर्यादित षटकांच्या स्पर्धांवर एक नजर
2024 मध्ये होणारा T20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजला देण्यात आला आहे.
2025 मध्ये होणारी ICC चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. आयसीसीने या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे सोपवले आहे.
T20 विश्वचषक 2026 मध्ये खेळवला जाणार आहे. ज्याचे आयोजन भारत आणि श्रीलंकेने केले आहे.
2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाईल. या स्पर्धेचे सामने दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवले जातील. तीन देश मिळून या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.
2028 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडे सोपवण्यात आले आहे.
2029 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भारताला मिळाले आहे.
2030 मध्ये इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे.
2031 मध्ये, भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करतील.
महत्वाच्या बातम्या
- देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल- शरद पवार
- गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करा- राहुल गांधी
- क्रांती रेडकरने शेअर केले समीर वानखेडेंचे जन्म प्रमाणपत्र
- ‘त्याला माझ्या कमतरता माहीत आहेत’, रोहितने केले न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूचे कौतुक
- वानखेडेप्रकरणी नवाब मलिक यांचा उच्च न्यायालयात अर्ज दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

