Share

आमच्या पगारात खा. राऊतांनी घर चालवून दाखवावे, एसटी कर्मचाऱ्यांचे आव्हान

Published On: 

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वीच आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मागील १० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु आहे. मात्र राज्य सरकारने विलीनीकरणाशिवाय कोणत्याही मुद्द्यावर चर्चेसाठी तयार असल्याचे म्हंटले आहे. त्यावर एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यादरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं आहे.

संजय राऊत औरंगाबादेत एका मुलाखतीमध्ये म्हणाले, ‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखा आहे. पगार मिळतो हे त्यावर समाधानी राहील’, पगार मिळतोय, चुल्ही पेटत आहेत, घरं राहिली आहेत, यावर आपण काही काळ समाधानी राहिलं पाहिजे. हळू हळू मार्ग निघतील ही आमची भूमिका आहे.

बाळासाहेबांनी पण नेमकं हेच असतं. एसटी कामगारांना पगार देण्यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळाला आता पर्यंत २ हजार कोटी रुपये दिले आहेत. ही लहान गोष्ट नाही. यापुढेही देणार पण काही मागण्या या कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत. आणि त्याच्यासाठी तुम्ही रक्त आटवलं. हे भिंतीवर डोक आपटून घेण्यासारखं असतं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

यावर मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. येथील एक आंदोलनकर्ता म्हणाला, संजय राऊतांनी एकच कळकळीची विनंती आहे, अशा प्रकारे बोलून आम्हाला आत्महत्या तरी करण्यास भाग पाडू नका.

मी संजय राऊतांना २५ हजार देतो त्यांनी त्यांचे घर चालवून दाखवावे. कामगार सात दिवस झाले याठिकाणी उपाशी राहुन आंदोलन करतोय, आन संजय राऊत काहीबी वकत्वे करत आहे. घसा बसला राव ओरडू ओरडू इथं, जनाची नाही तर मनाची बाळगावी राज्यकर्त्यांनी असे एक आंदोलनकर्ता टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!