Share

माझे वडील नेहमीच गांधीजींचे प्रशंसक राहिले आहेत-अनिता बोस

Published On: 

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावत हिने महात्मा गांधी आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. आता यावरच नेताजी बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महात्मा गांधी आणि माझे वडील नेताजी बोस हे दोघेही देशाच्या स्वातंत्र्य लढय़ातील महान नायक होते’, असे मत अनिता बोस यांनी व्यक्त केले आहे.

महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते. नेताजींचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी असल्यामुळे नेताजींना आपल्या नियंत्रणात ठेवता येणार नाही, असे गांधीजींना वाटत होते. पण, हे लक्षात घेतले पाहिजे की, माझे वडील नेहमीच गांधीजींचे प्रशंसक राहिले. त्यांनी गांधीजींचा आदर केला. स्वातंत्र्य लढय़ासाठी आपण करत असलेल्या कामाबद्दल गांधींजी काय म्हणत आहेत, हे नेताजी नेहमी जाणून घेण्यास उत्सुक असत. गांधीजी आणि नेताजी यांचे उद्दिष्ट एकच होते पण, त्यांचे मार्ग वेगवेगळे होते. त्यांच्यातील या मतभेदात पंडित नेहरूंना कोणाची बाजू घ्यायची नव्हती. पण, नंतर नेहरू गांधीवादी समर्थकांमध्ये सामील झाले, असे अनित बोस यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

दरम्यान कंगना राणावत हिने वृत्तपत्राच्या कात्रणाचा आधार घेत दावा केला की, नेताजी देशात परतले असते तर त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याची तयारी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महमद अली जिन्ना यांनी एका ब्रिटिश न्यायाधीशाकडे दाखवली होती.. भगत सिंह यांना फाशी दिली पाहिजे असेही गांधीजींचे मत होते व त्यासंबंधी पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा कंगनाने केला आहे. मात्र यावर अनिता बोस यांनी कोणताही दुजोरा दिला नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!