कोल्हापूर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यापार्श्वभूमीवर सोमय्या आज म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. सोमय्या हे मुरगूड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याबाबत सोमय्या यांनी पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. यानंतर मुरगूड येथे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने १५०० कोटींचा घोटाळा केला आहे. ही कला पण वेगळीच कला आहे. मुश्रीफांनी स्वतःच्या ग्रामविकास खात्याच्या कामाचे टेंडर स्वतःच्या जावयाच्या कंपनीलाच दिले. ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत त्या कंपन्यांमधून पैसे आले. ग्रामविकास खात्याने सगळ्या ग्रामपंचायतींसाठी निविदा काढल्या, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
मी येत्या ५ तारखेला जरंडेश्वर कारखान्यासह बारामतीला अभ्यासासाठी जाणार आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणे हा आपला अजेंडा असून त्याची सुरुवात आता केली आहे. आपल्याला कोणी कितीही अडवले तर आपण थांबणार नाही, असेही किरीट सोमैया यांनी स्पष्ट केले. ईडीला सामोरे गेलो तर सर्व घोटाळे बाहेर येतील, याची खात्री असल्याने अनिल परब यांच्यात ईडीपुढे येण्याची हिंम्मत नाही. ते ईडीपुढे येणार नाहीत, असेही सोमैया म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारच्या राज्यात घोटाळे करण्याच्या विविध कला ठाकरे आणि पवारांनी निर्माण केल्यात’
- आर आर पाटलांच्या सख्ख्या भावाकडे सोमय्यांनी केली हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार
- ‘मुंबै बँकेच्या बदनामीवरून उच्च न्यायालयात १ हजार कोटींचा दावा’, प्रवीण दरेकरांची माहिती
- ‘सोमय्यांच्या मागे आम्हीच हे फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी खुलेपणाने सांगावे’, सतेज पाटलांचे आव्हान
- ‘शेजाऱ्यांना रडणारे नाही तर लढणारे सरकार हवे आहे’, मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला चिमटा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

