🕒 1 min read
लातूर: जिल्हा हा सोयाबीन, डाळ, ऊस, या पिकांनी परिपूर्ण असा जिल्हा आहे. असे असतानाही बियाण लातूरच्या नावाने का नाहीत, लातूरचे सिड ब्रॅंड विकसित करा त्याच सोबत पोखरा किंवा अन्य योजनेमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिर करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘ब्रँड अँम्बेसेडर’ करा व त्यांच यशोगाथा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना आमदार धिरज देशमुख यांनी यांनी मंगळवारी दिनांक १५ जून रोजी दिल्या.
राज्यभरात नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे, पेरणीची तयारी सध्या गावा गावात बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार धिरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघातील शेती विषयक कामकाजाचा आणि सध्या कार्यान्वित असलेल्या पोखरा व इतर योजनेच्या बैठकीत आढावा घेतला. शेतकरी सक्षम व्हावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे, त्यासाठी योजनेची गती वाढवावी, आशा सूचना देखील आ. धिरज देशमुख यांनी दिल्या.
सध्या राज्यभरात पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मागे पेरणीची कामे लागली आहेत मात्र अनेक ठिकाणी पेरणी करण्याइतका पाऊस हॉट नसल्याने अनेक शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत. पाऊस गेल्या काही दिवसांपासून चांगला झाला असला तर मध्येच काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याचे दिसत आहे. तसेच कृषि विषयक तज्ञांनी देखील असे सांगितले आहे की कमीत कमी ८०-१०० मिमी पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीचा विचार करू नये.
महत्वाच्या बातम्या
- पदं रिक्त पण शासन सुस्त ! प्रलंबित भरत्यांवरून भाजप युवा मोर्चाचे आक्रोश आंदोलन
- पुण्यात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ !
- …तर पुण्यात पुन्हा कडक निर्बंध; अजित पवारांची पुणेकरांना तंबी !
- अध्यक्षपदावरून हटवल्याने चिराग पासवान संतप्त, बंडखोर पाचही खासदारांना पक्षातून हाकलले
- ‘माझा यावर विश्वासच नाहीये की रामभक्त असे करू शकतात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
