🕒 1 min read
औरंगाबाद : शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा समस्या आहे. अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर २-३ दिवस कचरा पडून असतो. भाजी बाजारात तर मोठ्या प्रमाणावर कचरा फेकला जातो. मात्र मनपा प्रशासनाचे नेहमीच याकडे दुर्लक्ष झाले आहे. आता शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी मनपाने स्वच्छता हेल्पलाईनचा प्रयोग सुरु केला आहे.
घनकचरा समस्येचे निराकरण फक्त एक कॉल दूर आहे. शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची सेवा देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता हेल्पलाईन तयार केली आहे. यावर कॉल करा आणि कचऱ्याशी संबधित समस्येपासून सुटकारा मिळवा. कचरा संकलन करणारे वाहन, रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे किंवा कचरा कचरा संबंधित इतर कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यास नागरिक स्वच्छता हेल्पलाईन नंबर 0240-2344145 वर कॉल करु शकतात.
आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये औरंगाबादला भारतातील पहिल्या १० स्वच्छ शहरांमध्ये समाविष्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली एएमसीची संपूर्ण यंत्रणा कठोर परिश्रम घेत आहे.
याबाबत घनकचरा विभागाचे भोंबे म्हणाले की, उपलब्ध यंत्रणा असूनही काही ठिकाणी कचरा उचलणे किंवा कचरा उचलण्याबाबत नागरिकांना चिंता असल्याचे दिसून येते. ‘या समस्या सोडविण्यासाठी एएमसीने कचरामुक्त शहरासाठी नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छ हेल्पलाईन उपलब्ध करुन दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आयुक्तांनी इतर रस्त्यांनींही जावे, म्हणजे त्यांचेही भाग्य उजळेल’
- वाईफमुळे त्रस्त असलेले जाधव म्हणतात ‘अ ब्युटीफुल लाईफ!’
- वडोदबाजार येथील आठवडी बाजार बंद
- परभणीत नागरी भागामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी
- एसटी महामंडळाच्या बसेस आता गंगापूरलाही थांबणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
