🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फुलंब्री तालुक्यातील महत्वाचा बाजार मानल्या जाणाऱ्या वडोद बाजार १५ मार्च पासून पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशानाने घेतला आहे. याबाबत जिल्ह्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
या नोटीसमध्ये सांगितले आहे की, सद्यस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यातील (शहर व ग्रामीण) सर्व प्रकारचे दुकाने, हॉटेल,चाट भांडार, भाजीमंडी, बाजारपेठा इ.ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. आठवडी बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून ग्रामपंचायत वडोद बाजार येथील १५ मार्चपासून बंद ठेवण्यात येईल. दर सोमवारी शेळी, मेंढी, जनावर व भाजीपाल्याचा भरणारा आठवडी बाजार जिल्हाधिकारी यांच्या पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे.
जिल्ह्यातील मागील काही दिवसापासून वाढता कोरोना संसर्ग पाहता जिल्हाप्रशासनाने अत्यंत कडक निर्णय घेतले आहे. त्याची अंमलबजावणी देखील चोख होत असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला तुमची गरज आहे, कृपया मास्क घाला;महापौरांची राज ठाकरेंना विनंती
- #MPSC : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा
- शिवसेनेच्या माजी खासदाराविरोधात शिवराळ भाषेत पोस्ट; अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा दाखल
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- मोठी बातमी : पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र ‘हे’ कडक निर्बंध लागू होणार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
