🕒 1 min read
औरंगाबाद : हर्षवर्धन जाधव हे आज काल राजकारणा पेक्षा संसारिक आणि खाजगी बाबतीच जास्त चर्चेत दिसत आहे. त्यांनी सोशल मीडियावर मैत्रीण इशा झा यांच्यासोबत ‘अ ब्युटीफुल लाईफ !’ असे लिहिलेला फोटो शेअर करुन इशा झा या ब्युटीफुल लाईफ असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाईफसाठी परेशान असलेले जाधव मात्र अ ब्युटीफुल लाईफ म्हणताना दिसत आहे.
हर्षवर्धन आणि इशा झा यांना त्यांच्या मातोश्रींनी शेतकरी मेळाव्या दरम्यान आशीर्वाद दिला होता. अशावेळी संजना या हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी म्हणून फिरत असतील तर ही लाजिरवाणी बाब आहे. संजना यांनी संजना दानवे म्हणून नक्की फिरावे, असेही हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
या फोटोने हर्षवर्धन जाधव यांच्या नव्या संसारिक जीवनाबद्दल सोशल मीडिया वर भरभरून प्रतिक्रिया येत आहे. मात्र, संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव आता पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा देखील सध्या सुरु आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष हर्षवर्धन आणि इशा झा यांच्या नव्या नात्याकडे लागले आहे. ते आता कधी एकत्र येणार? असा सवाल मात्र सध्या अनुत्तरीत आहे.
- राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे – नितेश राणे
- विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना अनिल बोंडे म्हणाले ‘तुम्ही तर सरकारचे कुत्रे’
- शिवसेनेच्या माजी खासदाराविरोधात शिवराळ भाषेत पोस्ट; अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा दाखल
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- #MPSC : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
