गंगापूर: औरंगाबाद, पुणे मुख्य महामार्गावरील सर्व विभागाच्या एसटी महामंडळाच्या बसेस गंगापूर जवळ थांबत नव्हत्या. वारंवार पत्रव्यवहार करून बस थांबण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र याठिकाणी बस थांबा नसल्याने बस थांबण्यास अडचणी निर्माण होत होत्या. गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांनी त्यांच्या आमदार निधीतून याठिकाणी दोन बसथांबे मंजूर केले आहेत. त्यामुळे बस थांबण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गंगापूर प्रवासी संघटना व स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानद्वारे वारंवार पत्रव्यवहार करून बस थांबण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु सुरुवातीला विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी या ठिकाणी बस थांबा नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आमदार निधीतून या ठिकाणी दोन बसथांबे मंजूर करण्यात आले.
परिवहन महामंडळाचे मंत्री अनिल परब त्यांच्याकडे नगरसेविका पल्लवी शिरसाट व स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव आबासाहेब शिरसाट यांनी पत्र पाठवले होते. त्यानंतर गंगापूर फाट्यावर बस थांबण्यासाठी सर्व विभागाच्या विभागीय नियंत्रकांना आदेशित करण्यात आले. एसटी महामंडळाच्या वतीने या ठिकाणी बस थांबा करून तिकीट मशीन मध्ये या फाट्याचा समाविष्ट करण्यात आला. असे पत्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक यांनी पल्लवी शिरसाट यांना दिले.
यानंतर या ठिकाणी बस थांबा झाल्याने औरंगाबादहुन पुण्याला जाणाऱ्या व पुण्याहून औरंगाबादला येणाऱ्या सर्व एसटी महामंडळाच्या बसेस याठिकाणी थांबल्याने परिसरातील प्रवाशांना प्रवासासाठी मार्ग सुखकर झाला आहे. पूर्वी पुण्याहून येणाऱ्या सर्व प्रवाशांना यापूर्वी औरंगाबाद किंवा वाळूज याठिकाणी तिकीट काढून जास्तीच्या तिकीटाचा भुर्दंड सहन करावा लागत होता. या निर्णयामुळे परिसरातील अनेक प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. सर्व नागरिक व प्रवासी संघटनेच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- कोविडकाळात तुरुंगातील गर्दी टाळण्यासाठी पॅरोलवर सोडण्यात आलेले तब्बल 200 कैदी फरार ?
- जीवन जगायची ओळखा नस, घ्या सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस – रामदास आठवले
- लॉकडाऊनमध्ये व्हिआयपींना दर्शन, वैद्यनाथ ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी
- मॅडम, माझं लग्न लावून द्या,तरुणाने केली पोलिसांकडे मागणी
- ‘इतिहासात लबाड म्हणून ठाकरे सरकारची नोंद होईल’


