Share

परभणीत नागरी भागामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी

Published On: 

🕒 1 min read

परभणी : कोरोना विषाणूच्या वाढत असलेल्या प्रादूर्भावाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून महानगर पालिका हद्द व पाच किलोमीटरचा परिसर तसेच सर्व महानगर पालिकेच्या क्षेत्रामध्ये सोमवारी (दि. १५) सकाळी सहावाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतून इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना दिलेल्या माहितीतून  जिल्ह्यात लॉकडाऊन केले जाणार आहे. मी जिल्हाधिकार्‍यांशी याबाबत बोललो आहे. असेही नमूद केले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकृत आदेशाकडे लागले होते.
जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजून तेविस मिनिटानी सुमारास काढलेल्या आदेशात या संचारबंदीच्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. अन्य संपूर्ण व्यवहार व बाजारपेठा पूर्णतः बंद राहतील, असे म्हटले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नाइलाजाने परभणी शहरामध्ये लाॅकडाऊन करण्याची वेळ आली असल्याचे या वेळी पालकमंत्री यांनी या दरम्यान सांगितले. तसेच नागरिकांनी विनाकारण तसेच विना मास्क फिरु नये, हात स्वच्छ धुवावेत, सॅनेटायझरचा वापर करावा, सामूहिक अंतर देखील पाळण्याचे आवाहन देखील या वेळी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांनी केले आहेत.

शहरामध्ये हे असेल तर सुरू 

शुक्रवार ते सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंचच्या काळात औषधी, किराणा, दूध या जीवनावश्यक वस्तूंसह अपवाद वगळता सर्व सुरु असेल.  

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!