Share

‘आयुक्तांनी इतर रस्त्यांनींही जावे, म्हणजे त्यांचेही भाग्य उजळेल’

Published On: 

औरंगाबाद : चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय ते राठी कॉम्प्लेस दरम्यान सांडपाण्याच्या नालीची तोडफोड केल्यामुळे रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. या पाण्याची तातडीने विल्हेवाट लावण्याची तसेच नाली दुरुस्त करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज दिले. मात्र शहरातील अनेक भागांमध्ये सर्रास अशाप्रकारे नाल्यांचे पाणी रस्त्यावर येते. मात्र, अशा ठिकाणी मनपा प्रशासनाचे लक्ष नाही. ज्या रस्त्यावरून आयुक्त जातात, फक्त त्याच रस्त्यांचे भाग्य उजळून ते दुरूस्त होतात अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्यात.

मात्र शहरातील अनेक भागांमध्ये सर्रास अशाप्रकारे नाल्यांचे पाणी रस्त्यावर येते. मात्र अशा ठिकाणी मनपा प्रशासनाचे लक्ष नाही. ज्या रस्त्यावरून आयुक्त जातात त्या रस्त्यांचे भविष्यच उजळते. यावर अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया नागरीकांनी दिल्या.

नॅशनल हायवे ऑथोरीटीचे काम सुरू असल्याने त्यांनी जागोजागी सांडपाण्याच्या नालीची तोडफोड केल्यामुळे रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. आयुक्त पाण्डेय हे आज शुक्रवारी सकाळी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक लसीची दुसरा डोस घेण्यासाठी चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जात होते.

त्यावेळी राठी कॉम्प्लेक्स समोर दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याचे तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूला नालीचे ढापे फोडून कचरा आणि गाळ वरती काढून टाकल्याचे यांच्या निदर्शनात आले. त्यांनी लस घेतल्यानंतर नालीची व रस्त्यावर आलेल्या सांडपाण्याची पाहणी केली असता या कामामुळे जागोजागी सांडपाण्याच्या नाली तोडफोड केल्याचे त्यांना सांगण्यात आले.

पाहणी केल्यानंतर या संदर्भात महानगरपालिका झोन ५ चे वार्ड अभियंता एस. एम. जाधव यांना नॅशनल हायवे अॅथॉरिटीच्या संबंधितांना लेखी पत्र देऊन तातडीने रस्त्यावरील पाणी व नालीचे तोडफोड करून रस्त्यावर टाकलेल्या घाणीचे, गाळाची तातडीने विल्हेवाट लावण्याचे व नाली दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!