Share

सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, मुख्यमंत्र्यांनी केली पवारांकडे नाराजी व्यक्त

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावर सरकारमधून काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु असतानाच आता महाविकास आघाडीतील वाद आणखी वाढू लागला आहे.  यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे पवार यांना सांगितले. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पुढाकाराने सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार टिकवणे ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे ध्यानात आणून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नितीन राऊत आणि अजित पवार यांच्यामध्ये देखील खडाजंगी झाल्याचे वृत्त समोर आले होते. राऊत यांनी या पत्रकामध्ये अजित पवार यांच्या कार्यशैलीबद्दलही उघड नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार जर मंत्रीमंडळ उपसमितीचे सर्व अधिकार आपल्यालाच आहे असे समजत असतील तर हा उपसमितीचा अपमान असल्याची भूमिका देखील नितीन राऊत यांनी यामध्ये मांडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!