मुंबई : भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अलीकडेच गायलेल्या एका गाण्यावरून सध्या चर्चा सुरू आहेच. अमृता यांच्या गाण्याची तुलना गायी-म्हशीच्या हंबरण्याशी करणारे निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. तर या सर्व प्रकरणाला आता राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसून येत आहे.
अमृता फडवणीस यांच्या गाण्यासंदर्भात पोस्ट शेअर केल्यानंतर महेश टिळेकरावंर नेटकऱ्यांनी निशाणा साधला. इतकंच नाही तर टिळेकर यांचे काही पोस्ट शेअर करत याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. टिळेकर यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सोबतचे फोटो व्हायरल करून, यामागे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हात असल्याची टीका देखील नेटकऱ्यांकडून करण्यात आली आहे. या सगळ्यांना उत्तर देताना टिळेकर यांनी एक पोस्ट फेसबुकवर शेअर करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडिवर तुफान व्हायरल होत आहे.
वाचा महेश टिळेकर यांची फेसबुक पोस्ट
राज… कारण..
बेसूर गाणं आणि ते गाणाऱ्या गायिकेच मी कौतुक न केल्यामुळ माझ्या पोस्ट मुळे अनेकांचे कान ठणकू लागले आहेत आणि त्यांना पोट दुखी पण सुरू झाली आणि त्यांचे पित्त उसळले आहे जे मला येणाऱ्या कमेंट्स मधून समजलं.शरद पवार साहेब आणि सुप्रिया ताई यांच्या बरोबरचे माझे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्या गायिकेच्या चाहत्यांनी ,भक्तांनी बोंबलायला सुरुवात केली. एखाद्या स्वयंघोषित गायिकेला मिळणारे चाहत्यांचे असे प्रेम मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते.संगीत भक्तांच्या लाडक्या गायिकेचा मी समाचार घेतला म्हणून ArohVelankar अरोह वेलणकर सारखा नट (?) चवताळून माझ्यावर टीका करायला पुढं आला.आरोह ला स्वतःच्या अभिनयाची(असेल तर)काळजी नाही पण त्याची गाण्याबद्दलची जाण आणि बेसूर गायकांच्या बद्दलचा कळवळा त्याने माझ्यावर टीका करून दाखवला आणि बिग बॉस नंतर चर्चेत राहण्यासाठी त्याने संधी साधून प्रसिध्दी मिळवून घेतली.तर असा हा प्रसिद्धीसाठी हपापलेला नट आरोह त्याला त्याची लायकी दाखवली आणि त्या भक्तांच्या गायिकेचा मी समाचार घेतला या सगळ्या मागे पवार कुटुंबाचा, शिवसेनेचा हात आहे,त्यांनीच मला टीका करायला सांगितलं असणार,त्यासाठी शिवसेना पक्षाने मला करोडो रुपये दिले आहेत असे आरोप करणाऱ्या शिव्या स्वरूपातील कमेंट्स मला मिळाल्या.मला माझं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि चांगलं गाणं कोणतं हे कळण्या इतकी अक्कल मला आहे त्यासाठी कुणी मला सांगायची गरज नाही.
गायिकेचा आवाज बेसूर नाहीच हे सिद्ध करून दाखवायला काहीच मुद्दे,हिम्मत नसल्यामुळे मग राजकीय रंग देऊन जन आक्रोश करणाऱ्या या लोकांची मला कीव आली. बरं हे कमेंट्स करणाऱ्यांचे फेसबुक प्रोफाईल मी चेक केले तर अर्ध्याऊन अधिक फेक अकाउंट्स आहेत आणि बाकीचे सगळे भा ज पा समर्थक आहेत.म्हणजे माझ्यावर झुंडीने येऊन शिव्या देण्याचे कॉन्ट्रॅक्ट यांना त्यांच्या पक्षा कडून, नेत्यांच्या कडून देण्यात आल्याचे सिद्ध होत नाही का?हीच त्या पक्षाची विचारधारा?त्या पक्ष्यातीला कार्यकर्त्यांची अक्कल किती आहे ते त्यांनी दाखवून दिलं आहेच.मला विधान परिषदेचे आमदार होण्याची भूक आहे म्हणून त्या गायिके वर मी टीका केली अश्याही कमेंट्स आल्यात.जे वाचून हसायला आले,एकतर विधान परिषद आमदार नावे कधीच फिक्स होऊन राज्यपालांच्या कडे गेली पण.आणि जर मला आमदार व्हायची इच्छा असती तर मी आधीच प्रयत्न केले असते पण आता या आरोपामुळे मी विचार नक्कीच करेल.
या पोस्ट मधील फोटोत,मराठी तारका कार्यक्रम पोलीस निधी साठी दोन वर्षांपूर्वी झाला तेंव्हा स्टेजवर भक्तांचे लाडके नेते चंद्रकांत पाटील माझ्या बरोबर आहेत हातात हात देताना. म्हणजे मी जे काही त्या गायिकेच्या आवाजावर टीका करण्याची करण्याची हिम्मत केली त्या मागे चद्रकांत पाटील यांचा हात आणि पाठिंबा आहे असाही अर्थ आता हे भक्त काढतील का हे फोटो पाहून? राजकारणात काट्याने काटा काढायचो असतो आणि या कामासाठी चंद्रकांत पाटील यांच्या कडून मला करोडो रुपये मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाही..आता काय म्हणाल माझ्यावर टीका करणाऱ्या भक्तांनो?भा ज पा नेते शरद पवारांची भेट घेतात ते फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतात तेंव्हा त्याचा वेगळा अर्थ काढून भा ज पा समर्थक,कार्यकर्ते त्यावेळी का त्यांच्या नेत्यावर टीका करत?
टीप: काहीही झालं तरी त्या गायिके वर लिहिलेली पोस्ट मी डिलीट करणार नाहीच.
महत्वाच्या बातम्या
- ‘ज्या राज्याचा मुख्यमंत्री घरीच बसून असतो, ते राज्य नेहमीच धोक्याच्या वळणावर असते’
- ‘नरेंद्र मोदी स्वतः सांगतात, ते अनेकदा शरद पवार यांचा सल्ला घेतात!’
- नियोजन न करता शिर्डीत येऊ नका; शिर्डी संस्थानने केले आवाहन!
- कोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : उद्धव ठाकरे
- महाराष्ट्राने आपला वीरपुत्र गमावला! जवान संग्राम पाटील यांना अखेरचा निरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

