Share

महाराष्ट्राने आपला वीरपुत्र गमावला! जवान संग्राम पाटील यांना अखेरचा निरोप 

Published On: 

कोल्हापूर : जम्मूमध्ये झालेल्या पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला. करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील संग्राम शिवाजी पाटील यांना शुक्रवारी मध्यरात्री वीरमरण आले. ही बातमी गावात कळताच परिसरात शोककळा पसरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवान संग्राम पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार झाले आहेत. गावातील चनिशेटी विद्यालयासमोरील क्रीडांगणावर त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले.

संग्राम पाटील हे भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते. निगवे खालसा गावासह परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. शहीद जवान हवालदार संग्राम पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या जवानाला वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

आठ दिवसापूर्वी ऐन दिवाळीतच शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांनी देशाच्या रक्षणासाठी अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या प्राणांची बाजी लावली. पाकिस्तानने 13 नोव्हेंबरला शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला होता. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या गोळीबारात महाराष्ट्राने आपला वीरपुत्र गमावला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!