Share

नियोजन न करता शिर्डीत येऊ नका; शिर्डी संस्थानने केले आवाहन!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारच्या आदेशानुसार १७ मार्चला शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर साई भक्तांसाठी बंद करण्यात आले होते. तब्बल आठ महिन्यानंतर हे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र दर्शनासाठी गर्दी होऊ नये, यासाठी दर्शनाच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. काल रविवार असल्यामुळे शिर्डी येथे दर्शनासाठी साई भक्तांची गर्दी झाली होती.

त्यामुळे कोणत्याही प्रकारची दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग न करता शिर्डीत येणाऱ्या भक्तांची गैरसोय होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा ही धोका आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कुठलेही नियोजन न करता शिर्डीत येऊ नका, असे आवाहनच संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केले आहे.

लॉकडाऊन नंतर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले. दर्शन सुलभ व सुखद व्हावे, यासाठी भक्तांना ऑनलाइन व मंदिर परिसरात काउंटरवर पासेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु दर्शनासाठी घालून देण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा जास्त साईभक्त हे शिर्डीमध्ये आता येऊ लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कुठलेही नियोजन न करता शिर्डीत येऊच नका, असे आवाहन संस्थानने केले आहे.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे म्हणाले की, साईभक्तांना विनंती आहे की त्यांनी दर्शनाची वेळ व तारीख निश्चित न करता शिर्डीत दर्शनासाठी येऊ नये. जर दर्शनाची वेळ व तारीख निश्चित न करता ते शिर्डीत दर्शनासाठी आले तर त्यांची गैरसोय होईल, तसेच गर्दीही वाढेल. गर्दी वाढल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन दुसरी लाट येऊन विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कुठलेही नियोजन न करता शिर्डीत येऊ नये.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!