Share

‘नरेंद्र मोदी स्वतः सांगतात, ते अनेकदा शरद पवार यांचा सल्ला घेतात!’

Published On: 

मुंबई : ‘राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,’ अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. ते पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी पुण्यात आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलत होते.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी देखील सडकून टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार व नेते संजय राऊत यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘याच मोदी सरकारने देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणचा किताब दिला आहे. याचा अर्थ मोदी सरकारला कळत नाही.’ असा पलटवार त्यांनी केला.

यासोबतच, ‘गेले अनेक वर्ष नरेंद्र मोदी सांगतात, मी शरद पवार यांचा सल्ला अनेकदा घेत असतो. ते काय त्यांची राजकारणातील उंची कमी असल्यामुळे? असं म्हणत संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा ताळतंत्र सुटला असल्याची घणाघाती टीका केली आहे. ‘ते पातळी सोडून टीका करतायत. शरद पवार हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. आम्ही त्यांना सद्याच्या काळातील भीष्मपितामह म्हणतो’ असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!