Share

“लोकप्रतिनिधी म्हणून कोळश्यासाठी केंद्रावर दबाव टाकला असता तर…”, महेश तपासे यांचा राणा दांपत्यावर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात सध्या हनुमान चालीसा प्रकरण चांगलेच गाजत आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी समर्थन केले आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे (Mahesh tapase) यांनी प्रतिक्रिया देत राणा दांपत्याला सल्ला दिला आहे.

“आज वीज निर्मितीचे संकट महाराष्ट्रासह देशातील इतर काही राज्यांमध्ये सुद्धा उद्भवत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून जर देशाच्या पंतप्रधानांवर दबाव टाकण्याचे काम या नेत्यांनी केले असते, अतिरिक्त कोळश्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकला असता किंवा कोळश्याच्या नियोजनाबाबत लोक सभेत प्रश्न उपस्थित केला असता तर महाराष्ट्रासह देशाच्या जनतेने त्यांचे कौतुक केले असते.”, असा टोला महेश तपासे यांनी लगावला आहे.

आज दुर्दैवाने काही नेते अशा महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देऊन राज्यात धार्मिक, सामाजिक व राजकीय वाद निर्माण करण्याचे आणि महाविकास आघाडी सरकार बदनाम करून राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु महाराष्ट्र कधीही अस्थिर होणार नाही, आणि राज्य सरकारही खंबीरपणे आपले कर्तव्ये पार पाडेल, असा आमचा पूर्ण विश्वास आहे. असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!