🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी समर्थन केले आहे. त्यातच राणा दांपत्यानी येत्या २३ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे (Mahesh tapase) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर येऊन हनुमान चालीसा वाचन करणार, अशा बातम्या वृत्त वाहिन्यांवर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे, हे लोक प्राधिनिधींचे काम आहे का? असा प्रश्न आमच्या मनात उपस्थित होतो. वास्तविक आपल्या जिल्ह्यासाठी, मतदार संघासाठी आणि राज्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवरून विकास करणे व कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे हेच लोक प्रतिनिधींचे काम आहे. परंतु भाजपच्या विचारांनी प्रेरित असलेल्या लोकांना कोणत्याही विकास कामात रस नसून, त्यांना फक्त राज्यातले सरकार अस्थिर करण्यामध्ये व राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्यामध्येच रस असल्याचे दिसून येते. असे महेश तपासे यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/maheshtapase/status/1517433268353658880
आज वीज निर्मितीचे संकट महाराष्ट्रासह देशातील इतर काही राज्यांमध्ये सुद्धा उद्भवत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून जर देशाच्या पंतप्रधानांवर दबाव टाकण्याचे काम या नेत्यांनी केले असते, अतिरिक्त कोळश्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकला असता किंवा कोळश्याच्या नियोजनाबाबत लोक सभेत प्रश्न उपस्थित केला असता तर महाराष्ट्रासह देशाच्या जनतेने त्यांचे कौतुक केले असते. आज दुर्दैवाने काही नेते अशा महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देऊन राज्यात धार्मिक, सामाजिक व राजकीय वाद निर्माण करण्याचे आणि महाविकास आघाडी सरकार बदनाम करून राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु महाराष्ट्र कधीही अस्थिर होणार नाही, आणि राज्य सरकारही खंबीरपणे आपले कर्तव्ये पार पाडेल, असा आमचा पूर्ण विश्वास आहे. असे महेश तपासे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर अजित पवार संतापले! म्हणाले, “तारतम्य…”
- संजय राऊतांच्या सभेसाठी वीज चोरी, पक्षांतर्गत चौकशीची सारवासारव!
- “आयुष्यभर मातोश्री वरचे धुणे-भांडे करून थोडी तरी सुबुद्धी…”, राम सातपुतेंचा संजय राऊतांना टोला
- “राणा दाम्पत्य हे भाजपच्या नौटंकी मधील पात्र आहे”- संजय राऊत
- अन् अजित पवार पत्रकारांवर चिडले! म्हणाले, “कॅमेऱ्यासमोर बोलणं बंद करेन”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
