बीड : बीड शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. कोरोना नियमांच्या खबरदारीसाठी पोलीस व्यस्त आहेत. याचाच फयदा चोरटे घेत आहेत. दुचाकी चोरीनंतर चोरट्यांनी आपला मोर्चा चक्क स्मशानभूमीकडे वळविला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन तरुणांच्या खोलीत घुसून चोरट्यांनी हात साफ केला.
मिळालेल्या माहितीनूसार, संत भगवान बाबा प्रतिष्ठानजवळील स्मशानभूमीत नगरपालिकेच्या वतीने कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार केले जातात. दीपक चंदर सेनुरे आणि संतोष सुभाष सागवाने या दोघांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. स्मशानभूमीच्या आवारातच ते दोघे एका खोलीमध्ये राहतात. रात्री-अपरात्री त्याठिकाणी आणलेल्या मृतदेहावर ते दोघे अंत्यसंस्कार करतात. रविवारी (दि.११) पहाटे १ वाजेच्या सुमारास त्यांनी कोरोनामुळे बळी पडलेल्या एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले.
याचदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या खोलीतील मोबाइल, लॅपटॉपसह यांची वैयक्तिक कागदपत्रे, कपडे आणि २७ हजार ५०० रूपयांची रोकड लंपास केली. सरपण, डिझेल विक्रीतून ते पैसे आले होते असे त्यांनी सांगितले. घटनास्थळी शहर ठाण्याच्या पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. स्मशानभूमीचा परिसर पिंजून काढत काही सुगावा लागतो का? याची चाचपणी केली असता बिंदुसरा नदीपात्रात चोरीचा लॅपटॉप सापडला.
महत्वाच्या बातम्या
- महाभारत मध्ये ‘देवराज इंद्र’ची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन
- संसर्ग वाढतोय आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – बाळासाहेब थोरात
- राज्यात कडक लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक
- …तर माझे नाव बदला, देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर जोरदार प्रहार
- मोठी बातमी : राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

