परभणी : कोराना रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आता लसीकराला वेग येणे गरजेचा आहे. तर परभणी जिल्हाला लसीचा साठा जिल्ह्यास मिळाला आहे. काही वेळात तो साठा शहरात दाखल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, कोवीशील्ड या लसीचे 17 हजार डोस जिल्ह्यात दाखल होणार आहेत. शहर आणि जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवरून लसीकरण पुन्हा लागलीच सुरू करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असताना या लसीचा साठा संपला होता. त्यामुळेच सर्वस्तरातून चिंता व्यक्त केल्या जात होती. या लसीचा साठा लवकर मिळावा तसेच लसीकरण पुन्हा सुरु व्हावे, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न देखील सुरु केले होते.
लसीच्या साठ्याची मागणी नोंदवण्याबरोबरच आरोग्य विभागाच्या संचालकांबरोबर जिल्हाधिकारी नियमीतपणे संपर्कात होते. जिल्ह्याकरिता आवश्यक तेवढी लस मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाच्या पाठपुराव्यास यश आले आहे. कोविशिल्ड लसीचे 17 डोस जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत. सोमवारी पहाटेच लसीचे डोस घेऊन हे वाहन परभणीकडे प्रयान केले आहे. अवघ्या काही वेळात परभणी शहरात लसीचे डोस घेऊन वाहन दाखल होणार असल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे.
दरम्यान, पुढील एक तासात 17 हजार डोस शहरात दाखल होणार आहेत. लगेचच लसीकरण सुरू व्हावे, यासाठी शहरासह जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावरील अधिकार्याशी संपर्क करुन त्यांना रुग्णालयात पाचारण देखील केले आहे. तातडीने त्यांच्याकडे लसीचा साठा देऊन लसीकरण पुन्हा लगेचच सुरू व्हावे, यादृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जे ऍक्टर होऊ इच्छितात त्यांनी ‘हे’ शिकावं’
- संसर्ग वाढतोय आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – बाळासाहेब थोरात
- ‘ब्रेक द चैन’मुळे प्राजक्ता उदास, लिहिली ‘ही’ पोस्ट
- कामगारांची कोरोना तपासणी न केल्याने मेडिकल व्यावसायिकांना दंड
- शरद पवार यांच्या पित्ताशयावर यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया ;तब्येत स्थिर – नवाब मलिक


