🕒 1 min read
मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून २ हेक्टरपर्यंत जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर तसेच बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशी १० हजार कोटींची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. अशी माहिती मदत व पुर्णवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्यावर शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम वर्ग करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. अतिवृष्टीमुळे ५५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून त्यापैकी ७०% नुकसान हे मराठवाडा विभागात झाले आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून २ हेक्टरपर्यंत जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर तसेच बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशी १० हजार कोटींची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. https://t.co/HV61dXtZ6G
— Ashok Chavan (@AshokChavan1958) October 25, 2021
त्यामुळे मदतीचा पहिला टप्पा हा मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्राधान्याने वर्ग करण्यात येत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा लवकरात लवकर मदत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांवरील संकट मोठं असलं तरी महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.
शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले, त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना या पैश्याची मदत होवून आधार मिळावा हा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- जगाला सध्या धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोका-रामदेव बाबा
- ‘देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है…’; भातखळकरांचा मलिकांना टोला
- ईडी म्हणजे पानतंबाखुचे दुकान, माझ्या घरीही धाड पडू शकते-आ. प्रणिती शिंदे
- ‘मोदी सरकारने पीक विम्याचा हप्ता रोखला’, सचिन सावंत यांचा आरोप
- “इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”; मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

