दीपक पाठक/पुणे- एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आ वासून उभं असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी मात्र वेगाने घडत आहेत. ६ जून रोजी विधानपरिषदेतल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागांवर नव्या सदस्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे विधान परिषदेत निवडून जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या काही जागा रिक्त होत आहेत. त्यातल्या एका जागेवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आमदार व्हावं, अशी खुली ऑफर राष्ट्रवादीने शेट्टी यांना दिली आहे.
या ऑफरबाबत राजू शेट्टी यांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘प्राथमिक चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्याशी यासंदर्भात थेट बोलणं झालेलं नाही. जयंत पाटील माझ्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते, त्यावेळी आमच्यात प्राथमिक चर्चा झाली. यापुढे अजूनही चर्चा होणार आहे’.
दरम्यान, आता एकेकाळी राजू शेट्टी यांचे सर्वात जवळचे मित्र असलेले माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीने सर्वांचे एकमत करून राजू शेट्टी यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करावी. मी स्वतः त्यांना पाठींबा देईन आणि पहिले स्वागत देखील मीच करेन एवढंच नव्हे तर मी स्वतः त्यांची मिरवणूक काढेन अशी घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली आहे. खोत यांनी ऑनलाईन घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, शेट्टी यांना आता आमदारकीचे शरद पवार यांनी आमंत्रण दिले आहेत ते आमंत्रण म्हणजे लबाडाच्या घरच्या जेवणाच्या आमंत्रणप्रमाणे आहे ते जेवल्या शिवाय काही खरं नाही असा टोला देखील त्यांनी लगावला.
राज्यपालांची हकालपट्टी करा, पंतप्रधान मोदींकडे करणार मागणी
कोरोनाचे संकट आणखी वाढले, मोदी-शाह घेणार 96 तासांच्या आत 38 बैठका
‘पवार साहेब सरकारला सध्या मार्गदर्शन करतात असं दिसत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

