नवी दिल्ली : कोरोना महामारीने देशात थैमान घातलं आहे. देशभरातमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ११९२९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३२०९२२ वर गेला आहे. तर १४९३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १६२३७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण ९१९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रित असताना तो उठविल्यानंतर लगेचच याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. कोरोनाच्या रुग्णांनी तीन लाखांचा आकडा पार केलेला असतानाच आजची आकडेवारी देशाला चिंतेत टाकणारी आहे. यामुळे कोरोना व्हायरसवर मात करण्याच्या दृष्टीने पुढील रणनीती, 96 तासांच्या आत होणाऱ्या 38 बैठकांमध्ये ठरवली जाणार आहे. याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारीच कॅबिनेटच्या काही वरिष्ठ सहकाऱ्यांसोबत केली.
16 जूनला 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होईल. पुढचा दिवस उरलेली 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून इनपुट्स घेण्यात आणि काही सूचना देण्यात जाईल. 96 तासांच्या या महामंथनातून पुढच्या दोन महिन्यांची रणनीती बाहेर येईल.
#corona : शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! थकबाकीदार असूनही नवं कर्ज मिळणार
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 200 च्या वर
कोरोनावर रामबाण औषध मिळाले; पतंजली योगपीठाच्या दाव्याने भारतीयांच्या आशा वाढल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

