मुंबई : मंत्रिमंडळाच्या निर्णयाला राज्यपालांनी विरोध न करता त्यावर अंतिम मोहोर लावायची असते. परंतु, राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यापासून राज्यपाल मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध करु लागले आहेत. सत्ता स्थापनेपासूनची राज्यपालांची दुटप्पी भूमिका ओळखून देशाचे नेते शरद पवार यांनी त्यांची भेट घेऊन समजूतही काढली. परंतु, त्यांच्यात काहीच सुधारणा झाल्याचे दिसत नाही. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पालक अन् विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. मात्र, त्यालाही त्यांनी विरोध केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शांत, संयमी असल्याने त्यांना राज्यातील सद्यस्थितीत भांडण करायचे नाही. मात्र, राज्याच्या हिताच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करावी, या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी दिली आहे.
थेट सरपंच निवड असो की बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या मतदानाचा अधिकार असे फडणवीस सरकारने केलेले बदल रद्द करुन या निवडणुका पूर्वीप्रमाणे व्हाव्यात, असा निर्णय महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाने घेतले. त्यानंतर तो अध्यादेश अंतिम स्वाक्षरीसाठी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याकडे पाठविले. मात्र, त्यांनी त्यावर स्वाक्षरी करण्यास जाणिवपूर्वक विलंब लावला. असा आरोप मुश्रिफ यांनी केला आहे.
‘रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा’
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा स्वभाव खूप गरीब आहे. मन मिळावू असून ते खूपच सज्जन आहेत. माहिती नसलेल्या गोष्टींबाबत सर्वांना विचारतात. अशा भावना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी व्यक्त केल्या आहेत.
राज्यातील कोरोनाचा संसर्ग पाहून उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक विद्यार्थी खूश झाले होते. त्यात राजकारण करुन राज्यपालांनी त्याला विरोध केला. मात्र, सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी असून विद्यार्थी, पालकांना अपेक्षित निर्णय होईल, अशी ग्वाही मंत्री मुश्रिफ यांनी दिली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

