Share

‘पवार साहेब सरकारला सध्या मार्गदर्शन करतात असं दिसत नाही’

Published On: 

पुणे : कोकण दौऱ्यावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर आरोप केले होते. यानंतर दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरु झाले.काल पवार यांच्याबद्दल बोलताना पाटील यांचा सूर काही वेगळाच दिसून आला. सरकारला सध्या पवार साहेब मार्गदर्शन करतात, असं दिसत नाही. पवारांच्या कामाचा वेग भयंकर असून सर्व देशाने पाहिलं आहे. आम्ही त्यांचा आदर ठेऊनच टीका करतो. या वयात कोकणात जाऊन त्यांनी दोन दिवस मुक्काम केला. या वयातही ते तब्येतीची काळजी न करता समस्येला झडप असं पाटील यांनी म्हटलं आहे.

‘सरकार कोरोनाच्या बाबतीत गोंधळलेलं आहे, मुळात हे सरकारचं लेचंपेचं हे, कोणी निर्णय करायचे कसे निर्णय करायचे ? याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळेच प्रशासकीय पातळीवर गोंधळ दिसत आहेस अशी टीकाही पाटील यांनी केली.

शरद पवार या सरकारला मार्गदर्शन करतात असं दिसत नाही, कारण त्यांचा कामाचा स्पीड भयंकर आहे, कदाचित मुलं-मुलं करत आहेत तर करू द्या अशी त्यांची भूमिका असावी तसंच मुख्यमंत्री हे तास दोन तासांचा कोकण दौरा करून येतात, याउलट पवार हे दोन दिवस कोकणात मुक्काम करतात. पवार या वयात दौऱ्यावर जात असतील तर मग राष्ट्रवादीचे जयंत पाटील, अजित पवार हे मंत्री कोकणात का जात नाहीत? असा टोला चंद्रकांत पाटलांनी आघाडी सरकारला लगावला.

दरम्यान, पुण्यात प्रायव्हेट हॉस्पिटलंची बीलं कोरोना पेशंट्ना भरायला सांगणं चुकीचं आहे. पालिकेनं सीएसआर फंडाद्वारे पैसा उभा करावा, केंद्र सरकार थेट पालिकेला आर्थिक मदत करू शकत नाही, त्यासाठी व्हाया राज्यच यावं लागेल. केंद्राकडून पुणे मनपाला कोणतीच मदत मिळाली नसल्याचा आरोप होत आहे, त्यावर पाटलांनी उत्तर दिले आहे.

कोकण दौऱ्यामुळे फडणवीसांच्या ज्ञानात तरी भर पडेल – शरद पवार

शरद पवार ‘जाणते राजे’च आहेत याच्यावर मी ठाम:जितेंद्र आव्हाड

शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात जितेंद्र आव्हाडांपेक्षा जास्त आदर – चंद्रकांत पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!