Share

यासाठी मी आमदार निलेश लंकेंचा प्रचारक म्हणून काम करणार- अण्णा हजारे

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यातील मुदत संपणार्‍या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि नगर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला होत असून पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार निलेश लंकेंनी केली आहे. त्यामुळे आता गावागावात ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

दरम्यान, बिनविरोध निवडणूकांचा उपक्रम महत्वाचा असून ग्रामपंचायतींच्या बिनविरोध निवडणूकांसाठी आमदार निलेश लंके यांचा प्रचारक म्हणून मी काम करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे बोलताना जाहिर केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!