Share

‘कितीही लखोबा-लोखंडे पाळले तरी महाविकास आघाडी अभेद्य आहे’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: समाज माध्यमावर महाविकास आघाडी सरकार, ठाकरे परिवार, शिवसेना नेते आणि शरद पवार यांची बदनामीकारक पोस्ट फेसबुकवर अपलोड करण्यात आल्या होत्या. या पोस्ट करणारा ‘लखोबा लोखंडे’ अर्थातच अभिजित लिमये याला पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि काळं फासलं आहे. दरम्यान हा ‘लखोबा लोखंडे’ भाजपची कृती असल्याचे काही नेत्यांनी म्हटले आहे. तर आता यावरच काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत भाजपवर निशाना साधला आहे.

‘कितीही ‘लखोबा-लोखंडे’ पाळले तरी ही महाविकास आघाडी अभेद्य आहे. लखोबा लोखंडेचे मालक या निमित्ताने समोर आलेयत. भारतीय जनता पक्षाने ट्रोल्सच्या माध्यमातून महाराष्ट्राचं राजकीय-सामाजिक वातावरण दूषित केलं आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.’ असे ट्वीट करत त्यांनी भाजपवर निशाना साधला आहे.

दरम्यान यावरच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या ‘लखोबा लोखंडे’वरुन भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. अभिजित लिमये याला सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी कॉल केला. मग त्याने जे लिखाण केल तेच फडणवीसांचं मत होतं का? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी केला आहे. दरम्यान ‘मला पकडून दाखवल्यास 100 कोटी रुपयांचे बक्षीस देणार’ असं चॅलेंज
अभिजीत लिमये याने दिले होते. दरम्यान त्याला पुणे सायबर क्राईमने ताब्यात घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!