Share

पंतप्रधान मोदी आणि बायडन यांच्यात होणार प्रत्यक्ष महत्वाची बैठक; व्हाईट हाऊसने दिली माहिती

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना काळानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचा दौरा करणार आहेत. ‘क्वाड’ देशांच्या परिषदेत नरेंद्र मोदी सहभागी होणार असून पहिल्यांदाच महत्वाच्या चार देशांचे नेते समोरासमोर एकमेकांना भेटणार आहेत. चार देशांच्या म्हणजेच क्वाड परिषदेसाठी नरेंद्र मोदी हे 24 सप्टेंबरला अमेरिकेला जाणार आहेत. या बैठकीत मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन हे देखील प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.

महत्वाचं म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन विराजमान झाल्यानंतर मोदी हे पहिल्यांदाच अमेरिकेला जाणार असून या दोन्ही नेत्यांमध्ये होणारी बैठक ही महत्वाची ठरणार आहे. दोन्ही राष्ट्रांमधील मैत्रीचे संबंध वाढून त्याचा परिणाम विकासकामांवर आणि जागतिक राजकारणावर देखील होईल. काही वेळापूर्वीच व्हाईट हाऊसने मोदी आणि बायडन या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याचे जाहीर केले आहे.

‘राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील.’ अशी अधिकृत माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. कोरोनाचा कठीण काळ आणि अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा यामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. भारताला देखील याचा मोठा फटका बसला असून अमेरिकेने देखील सावध भूमिका घेतली आहे. आता या दोन प्रमुख नेत्यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये दृढ संबंध निर्माण होण्यास अधिक चालना मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!