Share

राणेंना आणखी एक धक्का ? ‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द अखेर पाळला’ – विनायक राऊत

Published On: 

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी राज्य शासनाने 966 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून 100 विद्यार्थी क्षमतेच्या या महाविद्यालयाशी संलग्नित 500 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची 20 एकर जागा वैद्यकीय शिक्षण विभागास देण्यात आली आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) नवी दिल्ली यांचेकडून वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याकरिता यावर्षी मान्यता मिळाली आहे. या महाविद्यालयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश सुरु होणार असल्याने ठाकरे सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे. नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेज नंतर या महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षण सुरु करून ठाकरे सरकारने शह दिल्याचे बोलले जात आहे. याबाबत बोलताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना टोला लगावला आहे.

‘गेली पंचवीस-तीस वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत होता. काहींनी लोकांसाठी नाही तर स्वतः साठी विद्यालय मंजूर करून घेतले होते,’ असं म्हणत राऊत यांनी राणेंच्या खासगी महाविद्यालयावर निशाणा साधला. पुढे ते म्हणाले, ‘कोकणात गेली 25 वर्षे शासकीय महाविद्यालयाची मागणी होत होती. आज ही मागणी मान्य करीत 100 मुलांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळाल्यामुळे सिंधुदुर्ग वासियांची प्रतीक्षा संपली आहे. सिंधुदुर्ग वासियांना खऱ्या अर्थाने बाप्पा पावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द अखेर पाळला,’ असं म्हणत राऊत यांनी त्यांचे आभार देखील मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!