मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने परवानगी दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी कोकण दौऱ्यावर असताना चिपी विमानतळ सुरू करण्याचा शब्द कोकणवासियांना दिला होता. कोरोना काळातसुद्धा विकास कामाला गती देऊन मुख्यमंत्रीठाकरे यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली आहे. सिंधुदुर्गवासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न या शासनाने प्रत्यक्षात उतरवले आहे. दि.9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा होणार आहे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची घोषणा केली होती. यावेळी, मुख्यमंत्र्यांना बोलावणार का ? असा सवाल माध्यमांनी केला असता त्यांनी दिलेल्या उत्तरावरून शिवसेना आणि राणेंमध्ये पुन्हा एकदा वाद रंगल्याचे दिसून आले. आता विमानतळावरून उड्डाणांचा आणि उदघाटनाचा मार्ग मोकळा झाल्याने पुन्हा एकदा श्रेयवाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम एका दिवसाने वाढला, जामीन अर्जावर उद्या निकाल
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- तमाशा ही लोककला, परंतु बाजारू लोकांना ती कशी कळणार; सदाभाऊ मिटकरींवर भडकले
- महाराष्ट्र पुन्हा हादरला : नराधमांचा हैदोस, सामूहिक बलात्कार पीडितेचा दुर्दैवी मृत्यू
- मुनगंटीवार म्हणाले, बाळासाहेबांचा फोटो काढला तर शिवसेनेची किंमत…; शिवसेनेनं दिलं ‘हे’ प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

