परभणी : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अवघ्या ७ महिन्यांच्या चिमुकलीपासून ते महिलांपर्यंत अनेक बलात्कारांच्या गंभीर प्रकरणांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली जात आहे. विरोधी पक्ष हे राज्य सरकारवर टीका करत असून या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.
अशातच, आणखी दोन घटना समोर आल्या आहेत. नागपूर मध्ये एका अल्पवयीन बलात्कार पीडितेने ४ दिवसांपूर्वी आत्महत्या करून जीवन संपवले. तर दुर्दैवाने आज परभणी येथील अल्पवयीन युवतीचा मृत्यू झाला आहे. यामुळे महाराष्ट्राला आणखी एक हादरा बसला असून महिला सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला अत्याचारांच्या प्रकरणांमुळे निष्पाप महिलांचा बळी जात असून असून भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @maharashtra_hmo @Dev_Fadnavis @SMungantiwar @ChDadaPatil @Parbhani_Police @NagpurPolice @DGPMaharashtra @MeghnaBordikar @PravinDatke @BJYM4MH
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 20, 2021
‘नागपूर जरीपटका ७ महिन्यापुर्वी एका अल्पवयीन युवतीवर बलात्कार झाला होता. ४ दिवसांपूर्वी तिने आत्महत्या करतं स्वत:ला संपवले. परभणी सामुहीक बलात्कार पिडीतेचा अगदी काही क्षणापुर्वी मृत्यु झाला. सध्या गृहमंत्रालयाची आपल्याला माहीती नसते असं आज राज्याला कळालं म्हणून आपल्याला कळवत आहे,’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून ट्विट करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम एका दिवसाने वाढला, जामीन अर्जावर उद्या निकाल
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- तमाशा ही लोककला, परंतु बाजारू लोकांना ती कशी कळणार; सदाभाऊ मिटकरींवर भडकले
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- मुनगंटीवार म्हणाले, बाळासाहेबांचा फोटो काढला तर शिवसेनेची किंमत…; शिवसेनेनं दिलं ‘हे’ प्रत्युत्तर


