कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार गंभीर नाही, असा पुनरुच्चार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री यांना या प्रकरणाचे गांभीर्य नसल्याचंही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत या महाविकास आघाडी सरकार मधील कोणाचाच अभ्यास नाही. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री यांना या प्रकरणाचे गांभीर्य नाही. या नेत्यांना मराठा समाजातील गरीब वर्ग पुढे येऊ द्यायचा नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
तसंच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार गंभीर नसल्याचं पुनरुच्चारही त्यांनी केला. कोल्हापुर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार निशाणा साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार गंभीर नाही. फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणारे नव्हते अशी टीका करणं हे चुकीचं आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असा घणाघाती आरोप यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेला आहे.
महत्वाच्या बातम्या
- …आणि एसटी बस न्यावी लागली थेट पोलीस चौकीत
- लातूरमध्ये लोकांचा निष्काळजीपणा; सव्वापाच लाखांचा दंड वसूल
- ‘राज्याच्या कामात केंद्राची विनाकारण ढवळाढवळ’, मंत्री अशोक चव्हाणांची टीका
- इथे तर चक्क पोलिसांनाच मारहाण करून लुटले !
- ‘माझी हत्या करुन जिंकणार आहेत काय ? याचा बदला घ्यावा लागेल’ ममतांचा अमित शहांवर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
