नांदेड : मुंबईत मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. यावर सरकारमधील तिन्ही पक्षांतून यावर वेगवेगळी मते व्यक्त होत आहे. याच अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मोठे भाष्य केले आहे.
चव्हाण म्हणाले, अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ आढळलेली स्फोटके आणि मनसुख हिरन मृत्यू या दोन्ही प्रकरणांत राज्य सरकारच्या माध्यमातून तपास सुरू होता. तरीही या प्रकरणी तपासात एनआयएची आवश्यकता का पडावी, हा प्रश्न आहे. राज्यात अनेक चांगले अधिकारी आहेत. या प्रकरणांचा निश्चितपणे ते चांगल्या पद्धतीने तपास करू शकतात. पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकार त्यासाठी सक्षम आहे. म्हणून राज्याच्या कामात केंद्राचा हा विनाकारण हस्तक्षेप आहे असे मला दिसते, असे अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे सांगितले.
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी सचिन वाझे यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत मत मांडले.
मागील दोन आठवड्यांपासून इतर महानगरांसमवेत नांदेड जिल्ह्यातील वाढती करोना बाधितांची संख्या काळजी करण्यासारखी आहे. हा प्रार्दुभाव अधिक वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणाना दक्षतेचे निर्देश दिले असून, जिल्ह्यातील आरोग्य उपाययोजना संदर्भात शासन कमी पडणार नाही असा विश्वास यावेळी अशोक चव्हाण यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- प्रेमा तुझा रंग कसा? पत्नीच्या निधनानंतर जालन्यात वृद्ध पतीची आत्महत्या
- प्रेमाचा करुण अंत! रेल्वेखाली उडी घेऊन युवक-युवतीची आत्महत्या
- राष्ट्रवादीचे बॅनर, ‘सब जगह से पड रही है मार, धन्यवाद मोदी सरकार!’
- प्रवीण अमरे यांना दिल्ली कॅपिटलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी
- प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार


